नदीचे दोन काठ,
मनोमन हळहळतात,
तू तिथे मी इथे,
भेटणार नाही का आयुष्यात ?
काठावर फिरणा-या मुसाफिरासारखे,
परकेपणाचे विचार रेंगाळतात,
पण प्रेमाच्या अखंड प्रवाहाने ,
जोडलो आहोत आपण,
हे का नाही घेत ध्यानात ?
दगडमातीचे पूल जेव्हा ,
परकेपणा वाढवतात,
तेव्हा प्रेमाचा महापूर,
दोघांचेही अस्तित्व संपवून टाकतो,
जाणीव करून देतो कि,
मी तुमच्यासाठी नाही,
तुम्ही माझ्यासाठी आहात............
कवी - संजय माने,
महाड
No comments:
Post a Comment